पारोळा(प्रतिनिधी)- पारोळा येथील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रुप ग्रामपंचायत हिरापुर तालुका पारोळा जिल्हा जळगाव ,ग्रामपंचायत ,सर्व गावातील नागरिक ग्रामस्थ यांनी ठराव करून शासनाच्या Thanks a teachear या उपक्रमाचा शुभारंभ करत गावातील सर्व आबालवृद्ध नागरिक आणि विद्यार्थी यांचा आवडते राष्ट्रीय ,सामाजिक,शैक्षणिक सन्मान प्राप्त शिक्षक सुनील भिवा जाधव यांच्या बदलीमूळे शिक्षक दिनी त्यांचा नागरी सन्मान करण्याचे ठरवले.त्यांच्या बदलीमुळे गावाचे शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना निर्माण झाली.

सुनील जाधव यांनी सन 2012 ते 2019 या कालावधीत स्वतःची व विद्यार्थी गुणवत्ता,अध्यापन,सांस्कृतिक, शैक्षणिक सामाजिक कार्य ,भरीव लोकसहभाग मिळवत हिरापुर जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केला .चार वर्ग आणि दोनच वर्गखोल्या, त्याही गळणाऱ्या,शाळेला फरशी नाही ,कोणताच कार्यक्रम नाही ,शाळेवर कधी गट संमेलन सुद्धा व्हायचे नाही,शाळेला कोणत्याच भौतिक सुविधा नाहीत अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक सुनील जाधव यांनी गावात लोक प्रतिनिधी व गावकरी यांची सभा घेवून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली ,,,आणि आवाहन केले की, मुलांना इंग्रजी शाळेत पाठवणे बंद करा तीच गुणवत्ता आम्ही तुम्हाला आपल्या झेड पी शाळेत देतो ,त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि आजच्या काळातही गुरुजी काय करू शकतो ,याला सुरुवात करत सुनील जाधव यांनी शाळेला क्रीडांगण ,रस्ता , संघनक,स्मार्ट टिव्ही ,वर्गखोल्या लोकसहभागातून ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील,वासुदेव पाटील,योगेश पाटील, जे.के.पाटील,विजय पाटील,लाला पाटील,शांताराम पाटील,सौ.कल्पना पाटील ,सरपंच सरला नामदेव पाटील,दिनकर लहू पाटील,सुधाकर पाटील,सुरेश पाटील ,वाल्मीक पाटील,महेंद्र पाटील ,छोटू बापू ,दिनेश पाटील, विनोद पाटील,गावातील पोलिस पाटील,गावातील सरपंच ,तरुण मित्र मंडळ ,हे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचा एक मंडळ करून आर्थिक देणग्या ,रंग,बांधकाम साहित्य मिळवत शाळेला रंगरंगोटी करून ,दूरदर्शन संच, तीन संगणक संच मिळवून ड वर्गातील शाळा संवर्ग अ.मध्ये शाळा आणली .दोन खोल्यांची शाळेला लोकसहभागातून एक वर्गखोल्या आणि कार्यालयाचे बांधकाम केले .विविध स्पर्धेत मुलांनी यश प्राप्त केले .ग्रुप ग्रामपंचायत तंबोळे आणि हीरापूर् तालुका गुणवत्तेत केंद्रात पहिल्या,व दुसऱ्या क्रमांकावर आली . सुनील जाधव यांनी संगणक व टीव्ही प्रत्येक वर्गात लावून शाळा डिजिटल केली आहे .तशात जाधव सर यांची ऑनलाईन बदली झाली आणि गावात खूप नाराजी झाली ,,,पण जाधव सर यांनी घरोघरी जावून लोकांना आलेल्या शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले .सुनील जाधव यांनी शाळेत ज्ञान रचनावादी अध्यापन,संविधान जागर,स्वावलंबी शाळा,माझी शाळा माझे उपक्रम,विद्यार्थी मित्र,लोकसहभागातून डिजिटल शाळा,स्वप्न गुणवत्तेचे ,वार्षिक स्नेह संमेलन,शैक्षणिक प्रदर्शन असे विविध राबवत शासनाचे विविध उपक्रम,परिपाठ, जनजागृती, राष्ट्रीय सण यांचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि ते कायमचे लोकांच्या मनात घर केले.
या वर्षी शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हिरापुर ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या सुनील जाधव गुरुजी यांना सन्मान गौरव पत्र ,ट्रॉफी सरपंच सरला नामदेव पाटील यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले .सरपंच,शिक्षक,प्रतिष्ठित नागरिक ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वाल्मीक पाटील,भाऊसाहेब, माजी सरपंच लाला टेलर ,शशी वाणी सर,आणि ग्रामस्थ यांनी जाधव सरांच्या कामाची ओळख करत त्यांचे अभिनंदन केले .शिक्षक सुनील जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना प्रतिबंधक मास सर्वांना वाटले आणि गावातील हेवेदावे विसरून शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांना सहकार्य करत शालेय विकास आणि गुणवत्ता यासाठी सर्वांनी एकोपा ठेवा , शाळेची संरक्षण भिंत काम पूर्ण करण्याचे आवाहन केले .सर्वांना शाळेच्या विकासाची हात जोडून विनंती करताना शाळेच्या विकासासाठी सर्व राजकीय लोकांनी एकत्र काम करा,तरच गावाचा विकास होईल . शाळा सेमी इंग्रजी करण्याचे आवाहनही सुनील जाधव यांनी केले.शाळा ही गावाची ओळख झाली पाहिजे असे आवाहन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सरला नामदेव पाटील होते . प्रस्तावांना विजय मेणे यांनी तर आभार उपशिक्षक शशी वाणी सर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी साठी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेत आपल्या लाडक्या शिक्षकाचा सन्मान केला.







