मुंबई (वृत्तसंस्था) – उर्मिला मातोंडकरने मांडलेल्या थेट मतावर कंगना रणौतने अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करत ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हंटले आहे. यातच आता कंगनाच्या वादात दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिची थट्टा केली. ‘एक काम कर, तू चार-पाच जणांना घेऊन भारत-चीन सीमेवर लढायला जा’, असा उपरोधिक सल्लाच अनुरागने कंगनाला दिला.

फक्त तूच एक आहेस बहीण, एकमेव मणिकर्णिका. चार- पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर जा. त्यांना पण हे दाखवून दे की जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत या देशाचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या घरापासून LAC पर्यंत फक्त एका दिवसाचा प्रवास आहे’, असा उपरोधिक सल्ला अनुरागने कंगनाला दिला.’







