वडती ता.चोपडा (प्रतीनिधी) – चोपडा येथे एक नवीन मोठे कॉलेज व वरीष्ठ शासकीस कृषी महाविद्यालयाची गरज पहाता तालुक्यातील विद्यार्थ्यांंकरीता व शिक्षण क्षेत्रातील रिक्तपदे भरणे बाबत तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी लेखी निवेदनाव्दारे मांगणी केली आहे.


चोपडा तालुक्यात विविध कामांचा ध्यास घेवून भविष्याच्या दुरदृष्टीने शैक्षणिक विभागात भरीव विकास काम करण्याची नितांत गरज आहे. व ती उणीव भरून काढण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा व सुशिक्षित रोजगारचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तंत्रशिक्षण मंत्रीकडे साकडे घालून नव्याने कॉलेज व विद्यालयाची मांगणीसाठी तसेच रिक्त जागा भरणे बाबत आज आ. सौ. लताताई सोनवणे व मा. आ. चंद्रकांत आण्णा सोनवणे यांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत साहेब जळगाव जिल्ह्यात आले असता चोपडा तालुक्यात एक नवीन कला, विज्ञान, वाणिज्य व कृषी वरिष्ठ शासकीय महाविद्यालय सुरु करणेबाबत तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व अकृषी विद्यापीठात शा. शि. संचालक, उपसंचालक शा. शि. आणि सहायक संचालक शा. शि. ही यु. जी. सी. मान्यता प्राप्त पदे भरणेबाबतची मागणी करून त्याबाबत लेखी निवेदन दिले. या दोन्ही मागणीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावेळी मंत्री महोदयांच्या सत्कारही आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व उपजिल्हाप्रमुख मुन्ना भाऊ पाटील हे उपस्थित होते







