चक्रवर्ती सम्राट बळीराजा गौरव दिनानिमित्त
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) – चक्रवर्ती सम्राट बळीराजा गौरव दिनाचे औचित्य साधुन प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे .मी स्वत: बळीराजाचा पुत्र आहे. माझे आजोबा पणजोबा शेतकरी असल्याने शेतीची नाळ आजही कायम जुळलेली आहे. बळीरागामुळे आज जगाला अन्न धान्य मिळते आहे.
शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा आहे. यामुळे आजचा दिवस हा बळीराजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शेतकऱ्यांची स्वायत्त बाजारपेठ कशी उभी राहिल शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने शेतीमाल कशा पध्दतीने विकता येईल यासाठी प्रयत्नशील राहिल,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ग्वाही दिली. शहरातील काव्यरलावली चौकात सोमवारी पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार राजुमामा मोळे, महापौर भारतीताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंदकांत सोनवणे, परिवर्तन संस्थेचे शंभु पाटील, मजुर फेडरेशनचे पुरुषोत्तम चौधरी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एम पवार, सुरेश पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, शंभु सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, जि.प. सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, मुकुंदमाऊ सपकाळे, ग.स. सोसायटी चेअरमन मनोज पाटील, प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुचिता पाटील, रेणुका पाटील, लक्ष्मी पाटील, मनोहर पाटील, योगेश देशमुख, प्रांताधिकारी मनोज देशमुस्व, नगरसेवक सचिन पाटील, खुशाल आप्पा चव्हाण, गोपाल दर्जी, समीर जाधव, गुलाबराव देशमुश्व, सुमित पाटील, उज्ज्वल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शंभु पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, शेतकऱ्यांचा राजा, समाजमिमुख राजा, जनतेचे हित जोपासणारा रजा म्हणजे चक्रवती सम्राट बळीराजा. शेतकऱ्यांसह सामान्य मनतेविषयी आपुलकी बाळगुन बळीराजा पुण्यवान झाल्यामुळे इंद्र सुध्दा घाबरला होता. मात्र वामनाने कपट नितीने बळीराजाला पातळात गाडले. तरीही हजारो वर्ष बळीराजा लोकांच्या स्मरणात राहिला. म्हणून लोक ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो असं लोक म्हणतात. त्या राजाची स्मृती म्हणजे दिवाळी सण होय. त्या राजाची आठवण म्हणून बलिप्रतीपदा सागरी करतो. म्हणून आज बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करीत आहोत असे प्रतिपादन शंभु पाटील यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा होय. आपला गौरवशाली इतिहास आणि पराक्रमी पुर्वज चक्रवर्ती सम्राट बळीराजाचे स्मरण करण्यासाठी बळीराजा गौरव दिनाचे आयोजन करुन सर्व जाती, धर्मातील एकत्रित येवून मानवतेचा, समतेचा आणि कृषी संस्कृतीचा जागर करण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहेच, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून शेतकर्यांबद्दल तळमळ ठेवुन शासन दरबारी मी स्वत: पाठपुरावा करेल अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
आमदार राजुमामा म्हणाले की, निसर्गाच्या ऋतू चक्रामुळे शेतकरी भरडला गेला आहे. शासन दरबारी शेतकर्यांच्या समस्यां संधर्भात मागण्यांचा पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या पाठिशी उमे राहु. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला दर्जेदार बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन आ. भोळे यांनी केले.
महापौर सौ. भारतीताई सोनवणे म्हणाले की, निसर्गा पाठोपाठच कोरोनाच्या संर्सगामुळे शेती व्यवसायाला मोठया प्रमाणावर फटका बसला. या धक्यातून शेतकरी कसा उभा राहिल यासाठी शेतकऱ्यांची व्यथा व अडचणी दूर करण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शंभु पाटील यांनी केले.