जळगाव (प्रतिनिधी) – आज बुधवारी १८ नोव्हेंबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ४९ आढळली असुन दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३८९१ झाली आहे. त्यापैकी ५२२३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३६९ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ५९ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९६.९३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ३८ टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर १५, जळगाव ग्रामीण १, भुसावळ – ११, पाचोरा ३, भडगाव २, यावल ४, एरंडोल १, जामनेर ३, रावेर १, पारोळा २, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ४, इतर जिल्ह्यातील – १, एकुण – ४९ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर अमळनेर, चोपडा, धरणगाव, बोदवड असे ४ तालुक्यात रुग्णसंख्या निरंक दिसून आले आहे.







