जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात मुख्य तहसीलदार कार्यालयात बुधवारी १८ रोजी दुपारी वाहतूक जाम झाली होती. यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे तेथून जात असताना त्यांनी स्वत : वाहतूक पोलिसाची भूमिका बजावत वाहतूक मोकळी केली.


चाळीसगाव शहरात वाहतूक जाम होण्याची समस्या नेहमीचीच झाली आहे. वाहतूक नियमनासाठी पोलिसांची कमतरता कायम जाणवत असते. शहरातील अनेक चौकात बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहनधारकांमुळे वाहतुकीची समस्या नेहमीचीच झाली आहे. बुधवारी तहसिलचौक जवळील चौकात पुन्हा एकदा वाहतूक जाम झाली होती. यावेळी आ. मंगेश चव्हाण हे तहसील कार्यालयात काही कामानिमित आले असताना वाहतूक समस्येचा अडथळा त्यांना आला. मग त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.







