धानोरा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील धानोरा येथे अंगणवाडीला बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे गेट गायब झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
येथिल अंगणवाडीला ग्रामपंचायत माध्यमातुन चौदाव्या वित्त आयोगामधुन संरक्षक भिंत बांधण्यात आली. भिंतीला थातुर – मातुर गेट लावण्यात आले होते. ग्रामस्थांनी तक्रारी केल्याने येथिल गेट रातोरात काढण्यात आले. पण अजुनही येथे गेट बसवण्यात आलेले नाही. तरी लवकरच संरक्षण भिंतीला गेट बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. येथे दोन ठिकाणी गेट बसवण्यासाठी जागा सोडलेली आहे. गेट नसल्याने पुरुष मंडळी याच अंगणवाडीच्या मैदानात लघुशंका करतात. रात्री येथे पत्त्याचा अड्डा सुरु असतो. दिवसा याच मार्गातुन पुरुष शौचास जातात. हा सर्व त्रास अंगणवाडीतील सेविका – मदतनीस यांना सहन करावा लागत आहे.
गेल्या वेळेस येथिल सेविका – मदतनीस यांनी स्वच्छता मोहीम राबवली होती. याच्या बातम्या वर्तमानपत्रातुन प्रसिद्ध झाल्याने येथिल ग्रामपंचायत लाभलेले प्रशासक जितेंद्र पाटील यांनी या महीलांना बोलवुन दमबाजी दिली होती. यामुळे प्रशासक यांच्यावर महीलांनी नाराजी व्यक्त केली होती.
प्रशासकामुळे गावातील विकासकामांना एकला चालो रे !!
सध्या गावात प्रशासक बसल्याने आठवड्यातुन एकदाच ते ग्रामपंचायतला हजेरी लावत आहेत. गावात बोलणारे कुणी नसल्याचा फायदा घेत गावात काही ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातुन कामे सुरु केलेली आहे. पण ही कामे कोणत्या निधीतुन आहे ? कोण काम करतय ? अंदाजपत्रक काय आहे ? याबाबत कुणालाही माहीती दिली जात नसल्याने प्रशासकाची एकला चालो रे भुमिका दिसुन येत आहे.
अंगणवाडी गेट नसल्याचे बोलके चित्र !!