जळगाव ( प्रतिनिधी ) – जुन्या वादातून कुटुंबातील महिलांना मारहाण करणाऱ्या जमावाच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या मारहाणीत कुटुंबातील तरुण मुलगा जखमी झाला आहे .
एम आय डी सी पोलीस ठाण्यात मुमताज बी नासरीखान ( वय-८० , रा. मासुमवाडी, अबु वखर मशिद जवळ ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या या ठिकाणी मुलगा , सून , नातवंडांसोबत राहतात . जावेदखान शहरात रिक्षा चालवतो त्या मजुरी करतात त्यांचे भाऊ जाकीरखान नाशिरखान, महवुबखान नशिरखान हे कुटुंबासह शेजारी राहतात १२ मे रोजी गल्लीतील रामदेव गोलेवाले यांचेशी जफरखान हमीदखान याचा वाद झाला होता तेथे अफसरखान आला तो जफनखान याचेशी हुज्जत घालत असताना असतांना माझा भाऊ जाकीरखान भांडण सोडवण्यासाठी गेला नंतर अफसरखान याने जाकिरखं याच्याशी भांडण करुन त्याची मुले व इतर ८ नातेवाईकांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर रात्री रात्री शहरुख इकबाल ऊर्फ शहारुख मांडा, अफसरखान , गहारुब पिजारी, अशपाकशहा उस्मानशहा, जावेदशहा उस्मानशहा, मुस्तकिमखान
आदींनी हातात काठया व लोखंडी पाइप माझे धराजवळ आले त्यांनी जाकीरखान, जावंदखान, गुडडू., वसीम , फिरोजखान कुठे गेले आहेत त्यांना
बाहेर काढा आमच्याशी भांडण करतात का? जास्त मस्ती आले आहेत, अशी आरडाओरड करीत दगडफेक, शिवीगाळ केली त्यामुळे मी, रुकसार, हमीदावी, साजींदाबी , अमीना बी त्यांना समजावुन सांगत होतो , घरात आमचे लोक नाहीत ते बाहेर गेले आहेत. असे बोलत असतांना त्यांनी मला व सोबतच्या महिलांना लाथाबुक््यानी मारहाण केली . गल्लीतील लोकांनी त्यांना समजावुन भांडण सोडवले त्याचवेळी माझा मुलगा जावेदखान मासुमवाडी चौकातुन घरी येत असल्याचे पाहुन या आरोपींनी त्याला लोखंडी पाईपने डोक्यावर. खांदयावर, पाठीवर, पायावर व हातावर मारहाण करीत जखमी केले.
नांतर माझा भाऊ व इतर नातेवाईक आल्याने हे आरोपी तेथुन पळुन गेले या फिर्यादीवरून संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .