पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोऱ्यात २२ मेरोजी यंदाच्या निरंकारी संत समागमचे आयोज़न करण्यात आले आहे .
खान्देशातील धुळे , नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व निरंकारी भक्त दरवर्षी खान्देश संत समागम आयोजित करीत असतात यावर्षी 42 वां. खान्देश निरंकारी संत समागम पाचोरा येथे गुरूकुल इंग्लिश मेडियम स्कूल लगतच्या मैदानावर वरखेडी रोड येथे होणार आहे
पाचोरा येथे मोहन छाबडा यांचे अध्क्षतेखाली सायंकाळी 6 ते 9 या वेळेत निरंकारी भवन समोर जामनेर रोड पाचोरा येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे निरंकारी मंडल अध्यात्मीक जाग्रुतीसह सामाजिक कार्यात देखील योगदान देत आहे रक्तदान 🩸 शिबीराचे आयोजन, नशाबंदी, हुंडाबंदी, योगाभ्यास, नैसर्गिक आपत्तित मदत , वृक्ष लागवड आणि संवर्धन यासाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे
ईच्छुक भाविकांना ईश्वराची अनुभूति, देवाची ओलख करून देण्यासाठी ब्रह्मज्ञान प्रदान करण्यात येईल व अन्नदान होईल या कार्यक्रमास हज़ारों भाविक उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन हिरालाल पाटील ( धुळे ) व महेश वाघ ( 9890415211 ) यांनी केले आहे.