जळगाव (प्रतिनिधी) – मध्यरेल्वेतर्फे चाळीसगाव व धुळे विभागात आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर बुधवार दि. १७ व १८ रोजी प्रवाश्यांची तिकीट तपासणी करण्यात आली. दोन्ही दिवशी एकूण ४१० प्रकरणांमधून २ लाख ९८ हजार ९८५ रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.
विभागीय रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक आर.डी.क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली टिकिट तपासणी करण्यात आली. १७ मे रोजी चाळीसगाव-धुळे विभागाला ९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि २ आरपीएफ कर्मचारी असलेल्या ९६ प्रकरणांमधून रु.४३ हजार ४३५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
तसेच, १८ मे रोजी, १५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि स्टेशन आरपीएफ कर्मचारी यांनी भुसावळ स्थानकावर तपासणी केली. त्यांनी भुसावळ स्थानकावर ३१४ प्रकरणे तयार केली आणि २ लाख ३५ हजार ५५० रुपयांचा महसूल मिळवला. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) आर.डी.क्षीरसागर व सहायक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग) हे स्वतः दोन दिवस तपासणी करत होते. सोबत विभागीय तिकीट तपासणी निरीक्षक पवार देखील उपस्थित होते. दोन दिवसात २ लाख ९८ हजार ९८५ चा महसूल प्राप्त झाला.