पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाडी येथे घरासमोरून अज्ञात चोरटयांनी ३ लाख ८० हजार ५०० रुपयांच्या कृषी साहित्यासह भांडी, कापूस, बाजरी चोरून नेल्याची घटना २९ नोव्हेम्बर २०२२ ते १६ मे २०२३ दरम्यान कधीतरी घडली आहे. दि. १७ मे रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधना गणेश भोसले (वय ४०, रा. वाडी ह. मु. निल्लोड, ता. सिल्लोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने वाडी येथील राहत्या घरासमोरून २९ नोव्हेम्बर २०२२ ते १६ मे २०२३ दरम्यान कधीतरी अंगणात ठेवलेला ३ लाख रुपयांचा ४० क्विंटल कापूस, ३० हजार रुपये किमतीचे १२ क्विंटल बाजरी, ३ हजार रुपये किमतीचे गॅस शेगडी, सिलेंडर यासह संसारोपयोगी वस्तू, ७ पातेले असा ३ लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना रवींद्रसिंग पाटील करीत आहे.