जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन ( वोपा ) व्ही स्कुल अँपचे फेज 3 शैक्षणिक साहित्य निर्मितीचे काम उल्लेखनीयरित्या पूर्ण केल्याबद्दल शिक्षकांचा सन्मान नियोजन भवन येथे करण्यात आला.
तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे , पालक शिक्षक यांना विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे सोईचे व्हावे यासाठी व्ही स्कुल अँपमार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्माण करून शिक्षण क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल तालुक्यातील मराठी व उर्दू शिक्षकांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत डॉ. पंकज आशिया ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ) नितीन बच्छाव ( शिक्षणाधिकारी माध्यमिक ) , विकास पाटील ( शिक्षणाधिकारी प्राथमिक ) प्रफुल्ल ( वोपा संस्थापक पुणे ) , राजेंद्र सपकाळे ( उपशिक्षणाधिकारी ) , विजय पवार ( उपशिक्षणाधिकारी ) , खलील शेख ( जिल्हा समन्वयक ) , ऋतूजा जेवे ( संचालक वोपा ) , सरला पाटील ( शिक्षण विस्तार अधिकारी , वोपा सदस्य आदिती , राहुल , सुधिर , शाहीद , नदिम यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, व शिक्षक उपस्थित होते.
योगेश भालेराव ( गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगांव ) , मनोज भालेराव ( प्रगती प्रा.विद्या.जळगांव ) , प्रणिता पाटील ( जि. प.प्रा.शाळा शिरसोली प्र.बो.) , माधवी वाघ ( जि. प.प्रा.शाळा कुसुंबा खु.) , संगीता गोहिल ( प्रगती प्रा.शाळा जळगांव) , स्वप्नील कांडाळकर ( जि.प.प्रा.शाळा पळसोद ), सागर पाटील( सु.ग.देवकर प्रा.शाळा जळगांव) , प्रशांत साखरे ( सु.ग.देवकर प्रा.शाळा जळगांव) , कुणाल पवार ( जि. प.प्रा.शाळा कानसवाडे) व तंत्रस्नेही शिक्षक नितीन मेने ( जि. प.प्रा.शाळा वराड बु.) , लोटन पवार ( जि. प.प्रा.शाळा बेडी) , सुनील दाभाडे ( मानवसेवा विद्यालय जळगांव) यांचा सत्कार .जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
या शिक्षकांना खलील शेख ( शिक्षण विस्तार अधिकारी ) , फिरोज पठाण ( गटशिक्षणाधिकारी ) आदिती (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.