पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील ग्रामपंचायतीत गत २५ वर्षांपासून सत्तेत असणार्या शिवसेनेला निकालातून धक्का बसला असून राष्ट्रवादी व भाजपला येथे यश मिळाले आहे.

आज सकाळी लागलेल्या निकालातून नगरदेवळा या अतिशय महत्वाच्या गावात शिवसेनेला हादरा बसला आहे. येथे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. यंदा मात्र निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात शिवसेनेला ७ तर भाजप व राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या आहेत.







