जळगाव (प्रतिनिधी) – युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज अशोक कावडीया यांची भारतीय रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली तर्फे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपभोक्ता परामर्शदात्री (प्रवाशी) सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
सदर निवडचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच कावडीया यांना प्राप्त झाले असून १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सदर पदाचा कालावधी राहणार आहे.मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर विभागीय रेल्वे मध्य क्षेत्रीय रेल्वेच्या अंतर्गत येतात. अंदाजे ४७६ रेल्वे स्थानक या क्षेत्रीय रेल समितीच्या अंतर्गत येतात.
सदर वरील सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांच्या दृष्टीनी सुख-सुविधा, नवीन रेल्वे स्थानक, गाड्यांच्या वेळेत सुधारीत बदल, रेलवे प्रशासनातर्फे उपलब्ध सेवांमध्ये सुधार, रेल भाड्यातील दरवाढी विषयी प्रवाश्यांचे मत, इत्यादी विषयी मत मांडून योग्य तो बदल करून घेणे सदर समितीच्या सदस्यांचा मुख्य ध्येय असतो.
“रेल प्रवाश्यांच्या हिताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे व रेलवे बोर्ड व प्रवाश्यांमधील दुवा बनून समन्वय साधने माझे मुख्य ध्येय राहणार”अशी भावना विराज कावडीया यांनी व्यक्त केली.

या साठी विराज कावडीया यांना माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजयजी सावंत, शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ, माजी महापौर रमेशदादा जैन, नितीनजी लद्धा, शिवसेना महानगरप्रमुख शरदजी तायडे, युवासेना जिल्हाधिकारी शिवराजजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.







