• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनं नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे.

राज्य सरकारने शिवजयंतीच्या मिरवणूकीला परवानगी नाकारल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन तख्तावर औरंगजेब बसलाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलंय. आजपर्यंत सरकारमधील मंत्र्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर या सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही, मात्र शिवजयंती उत्सव साजरा करताना सरकारला कोरोनाची नियमावली आठवते. या मुघल विचारसरणी असणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असं भाजपाने म्हटलं आहे.

भाजपाच्या या टीकेनंतर शिवसेनेनं देखील यावर प्रत्युत्तर दिलं आहे. भिवंडीमध्ये शिवजंयती साजरी करण्यात येत नव्हती. तेव्हा शिवसेनेच्या पुढाकारने ती पुन्हा सुरु करण्यात आली, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच कोरोना अजून गेलेला नाही. राज्य सरकारने सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेले आहे. शिवजयंतीला विरोध असणं शक्य आहे का, असा सवाल उपस्थित करत हे शिवभक्तांचं सरकार आहे, असंही सुभाष देसाई यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या काय आहेत मार्गदर्शक सूचना?

१) अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

२) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

३) कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

४) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

६) Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे


 

 

Previous Post

एकनाथराव खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण

Next Post

राकेश टिकैत यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राकेश टिकैत यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon