जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात आठ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव शहर-०१ , जळगाव ग्रामीण -०२, भुसावळ-०१, चोपडा-०२ मुक्ताईनगर -०१, पाचोरा -०१ असे एकुण ०८ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५०३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.