जळगाव ( प्रतिनिधी ) – वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या पंटरविरुद्ध रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल झाला होता. उपप्रादेशीक परिवहन अधीकारी शाम लोही, राजाराम निमसे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जदारातर्फे जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने या दोघांच्या सहभागाची चौकशी पोलिसांनी करावी असे आदेश पारित केले आहे.
वाहन हस्तांतरण कामासाठी लाच मागणारा भुसावळ येथिल प्रशांत जगन्नाथ भोळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोळे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांचा पंटर असल्याचे तक्रारदार वाहन प्रतिनिधी गणेश कौतीकराव ढेंगे (वय ५९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांनी फिर्यादीत म्हटले होते. फिर्यादी गणेश ढेंगे हे ६ ऑक्टोबर रोजी जितेंद्र सोनार यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ७७००) हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यांनी शासकीय शुल्क ४०० रुपये भरले. यानंतर भोळे याने अधिकार्यांच्या सहिसाठी आणखी ३०० रुपये लागतील असे सांगीतले होते.याबाबत ढेंगे यांनी नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे(ता तक्रार दिल्यावरुन ११ ऑक्टोबर रोजी सापळा रचुन भोळे याला अटक करण्यात आली होती.
भोळेला गाठुन पैशांबाबत बोलणी केली. ‘अॅक्चुली खरी गोष्ट सांगा, भाऊसाहेबांचे किती असे सांगा’ अशी विचारणा केली असता भोळेने सांगीतले की, ‘२० रुपये भाऊसाहेब आणि साहेबाच्या स्टारचे १००, आणि ज्युनिअरचे ५० रुपये असे १७० रुपये आणि आपला पोरगा फी, घेतो ३० रुपये’ असे २०० रूपये भोळेने लाच मागीतली. भोळेच्या सांगीतल्यानुसार, ढेंगे अकील नावाच्या मुलाकडे गेले. दोघांमध्ये पैशांबाबत बोलणी झाली. २०० रुपये नंतर देणार असल्याचे ढेंगेंनी सांगीतले. भोळे व अकील याांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग लाचलूचपत विभागाला सेापवले होते.
तक्रारदाराने जिल्हा न्यायालयात धाव घेत आरटीओ शाम लोही, राजाराम निमसे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अर्जावर न्या.डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात कामकाज होवुन न्यायालयाने कलम-२०२ प्रमाणे चौकशी करण्याचे आदेश पारित केल आहे.