पाचोरा ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाचोरा शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून प्रवीण विश्वनाथ पाटील यांची शहराध्यक्षपदी तर कुणाल कृष्णराव पाटील यांची शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल पाचोरा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत तालुका उपाध्यक्ष प्रा. साहेबराव थोरात, सुनील देशमुख, तालुका सरचिटणीस राहुल बोरसे तालुका चिटणीस चंद्रकांत पाटील, तालुका कार्यकारिणीचे सदस्य प्रदीप सोमवांशी, कैलास पाटील, पत्रकार नागराज पाटील, गणेश शिंदे व राजे संभाजी फाऊंडेशनचे आधारस्तंभ भूषण देशमुख, राजेंद्र पाटील, गणेश पाटील उपस्थित होते.
या कार्यकारिणीत अमोल पाटील- कार्याध्यक्ष , अक्षय देशमुख-उपाध्यक्ष , सागर भोसले-उपाध्यक्ष , मनोज पाटील-चिटणीस , निखिल महाजन-चिटणीस, राहुल पाटील खजिनदार , सचिन पाटील -संघटक , चेतन पाटील -संघटक , सागर पवार-सहसंघटक , सचिन पाटील -सहसंघटक , नितीन पाटील -प्रसिद्धी प्रमुख , राहुल पाटील-समन्वयक यांचा समावेश आहे.