पारोळा ( प्रतिनिधी ) – शिरसोदे येथील खंडेराव महाराज मंदीरातील दानपेटी फोडून रोकडसह मुद्देमाल चोरून नेला आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोदे गावाच्या बाहेर खंडेराव महाराजांचे मंदिर आहे मंदिराची देखभाल रवींद्र कन्हैयालाल गुरव पाहतात. १६ एप्रिलरोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून कुलूप लावून ते घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीतील ३ हजार ५०० हजाराची रोकड, ऍम्प्लिफायर आणि बेन्टेक्सचे दागिने असा ८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. रविंद्र गुरव यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ इकबाल शेख करीत आहेत .