जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोलाणे येथील मागील भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला ३ जणांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. तसेच याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला रविवारी १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रणजीत जगदीश कोळी (वय-१८) रा. भोलाणे या तरुणाला रविवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा गोट्या उर्फ समाधान दिगंबर कोळी, शरद भागवत कोळी आणि चावदस भिका कोळी, तिघे रा. बोलाणे, ता.जि. जळगाव यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर एकाने लाकडी काठीने डोक्यावर टाकून रणजीत कोळी याला तब्येत दुखापत केली, या संदर्भात रात्री ११ वाजता रणजीत कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोट्या उर्फ समाधान दिगंबर कोळी, शरद भागवत कोळी आणि चावदस भिका कोळी या तिघांवर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.