जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे या उपक्रमात सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत्या शनिवारी जळगावात येत आहेत .
रुग्णांनी पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे, गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घेण्यासाठी ही संधी वाया घालवू नये . पाय आणि घोट्याच्या तक्रारीसाठी खास तपासणी डिजिटल मशिनद्वारे केली जाणार आहे.
हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा आणि उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी + 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधावा . शनिवार, (. २१ मे ) रोजी अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे
सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.