जळगाव ( प्रतिनिधी ) – धनराज बिरारी यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देऊ असे आश्वासन आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुवर्णकार समाजातील संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले .
जिल्हा दूध संघातील रोजदारी कामगार धनराज बिरारी यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या पत्नीस कायम नोकरी मिळावी, जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा , त्यांचा मृतदेह जिल्हा दूध संघाच्या प्रवेशद्वारावर घेऊन गेलेल्या कुटुंबियांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करा , आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेना व अहिर सुवर्णकार समाज महिला मंडाळाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .
जिल्हा दूध संघाशी काहीही संबंध नसलेल्या नादुरुस्त टँकरमधील दूध दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी धनराज बिरारी यांना १३ मेरोजी पाठवले होते . त्या दिवशी त्यांची ड्युटी संपलेली असली तरी त्यांना जावे लागले आणि मुक्ताईनगरजवळ अपघातात त्यांचा मृत्यू झाला . त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे . या निवेदनावर नगरसेविका रंजना वानखेडे , संजय विसपुते आदींच्या सह्या आहेत . या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे , आमदार राजूमामा भोळे यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी विजय वानखेडे, संगिता विसपुते, राजश्री पगार, सुवर्णा बागुल, रुपाली वाघ, राजेश बिरारी, नितीन सोनार, मनोज सोनार, उमेश वडनेरे, राजेंद्र विसपुते, रमेश सोनार, अरुण वडनेरे, जगदीश देवरे, राजेंद्र दुसाने, शरद दंडगव्हाळ, विनोद दंडगव्हाळ, केतन सोनार, संजय पगार, लोटन भामरे, सागर बागुल, उमेध विसपुते, सुधाकर दुसाने, भगवान सोनार, सुरेश सोनार, प्रकाश बाविस्कर, बाळकृष्ण दुसाने, मयूर दुसाने, विपुल चव्हाण, उमेश सोनार.आदी उपस्थित होते .