नवी मुंबई (वृत्तसंस्था) – महाविकास आघाडी सरकारवर अगोदरच भाजपकडून टीका केली जात आहे. असे असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मध्यन्तरी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मिसेस फडणवीस यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे. त्यावरून त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘ तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है , देखें अबके किसका नंबर आता है !’ हे त्यांनी नवे ट्विट करून तौक्ते चक्रीवादळ व राज्यातील आघाडी सरकारच्याबाबत असणारे मत व्यक्त केले आहे.
राज्यातील आघाडी सरकारच्याबाबत नेहमी टीकास्त्र सोडणारे भाजपनेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर पोट निवडणुकीवेळी एक केलेलं विधान आजही लोक विसरलेले नाहीत. ते म्हणजे ‘या सरकारचा कार्यक्रम करूनच दाखवतो.’ त्यांच्या विधानानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत विधान केलं आहे. त्यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर एकीकडे मुंबईत आतापर्यंत आलेली संकटे व तयावेळी खंभीरपणे उभी राहिलेली मुंबई असे अप्रत्यक्षपणे सांगत मुंबईमध्ये अनेक तुफान येत असतात याविषयी तर दुसरीकडे आता कुणाचा नंबर आहे. असे महाविकास आघाडी सरकारच्याबाबत एक प्रकारे राजकीय भाषेतून मत व्यक्त केलं. अमृता फडणवीसांच्या या नव्या ट्विटमुळे त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.