जळगाव (प्रतिनिधी) – जळगावहुन भडगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वराला मालवाहू छोटा हत्ती वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील शिरसोली गावाजवळील आकाशवाणी येथे घडली त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.
संतोष रमेश पाटील (वय 34, रा. गोंडगाव ता. भडगाव ) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष पाटील हा नातेवाईकांसह जळगावातील पंढरपूर नगर मध्ये आजीच्या अंत्यविधीसाठी आलेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर सर्वजण आज पुन्हा गोंडगाव ता.भडगाव येथे जाण्यासाठी निघाले असता संतोष पाटील दुचाकीवर होता तर काही नातेवाईक क्रूझर गाडीने पुढे निघाले होते.
शिरसोली आकाशवाणी जवळ एम.एच. 19 बी.ए. 5423 दुचाकीवरील संतोष पाटील याला पाचोराकडून भरधाव येणाऱ्या एम.एच.04 ई.वाय.4172 मालवाहू छोटा हत्ती वरील चालकाने धडक दिली यात संतोष पाटील हा जागीच ठार झाला यावेळी मालवाहू छोटा हत्ती वरील चालक धडक देऊन पसार होत असतांना गावातील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पाठलाग करून चालकाला पकडले. आणि मयत संतोष याला बारी यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आनले. यात तो मयत झाला आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिरसोली येथील काही नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
मयत संतोष पाटील यांच्या पच्छात पत्नी 2 मुले ,2 भाऊ आई – वडील असा परिवार आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस पोहोचले असुन पुढील तपास सुरु आहे.