नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची अचानक प्रकृती खालावली आहे. दरम्यान, त्यांना तात्काळ तुरुंग प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

आसाराम बापू यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच तुरूंग प्रशासने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले मात्र त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना महात्मा गांधी हॉस्पिटलमधून माथुर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम बापू तुरूंगात कैद असताना मंगळवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आसाराम यांना रक्त दाबाचा त्रास असून त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. तसेच त्यांच्या छातीतही वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







