जामनेर तालुक्यातील देवळसगाव गावात तसेच सुनसगाव येथे शिवसेनेचे सरपंचपदी निवड


जामनेर (प्रतिनिधी) – देवळसगाव येथे सात पैकी चार जागेवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आज झालेल्या सरपंच निवड वेळी शिवसेनेचे सरपंच पदी सौ. रुपाली कोळी तर उपसरपंचपदी रवींद्र तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सुनसगाव येथे शिवसेनेच्या वैशाली विजय पाटील तर राष्ट्रवादीचे उपसरपंचपदी दत्ता शालिक साबळे यांची निवड करण्यात आली या सर्व सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य यांचा सत्कार जामनेर तालुका शिवसेना शाखेतर्फे करण्यात आला या सर्व सदस्यांचा सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील विधानसभा क्षेत्र तथा ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश राव पांढरे युवासेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार मनोज देवकर करण माळी किरण पाटील भैय्या पाटील मयूर परदेशी विभाग प्रमुख विलास मांडे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







