• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संदीप नाहरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि पत्नीच्या आईविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – एकिकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून कलाविश्व सावरत नाही, तोच आणखी एका कलाकारानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि पुन्हा एकदा कलाविश्वाला हादरा बसला. अभिनेता संदीप नाहर यानं आत्महत्या करत आयुष्य संपवल्याचं कळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. सदर प्रकरणी मुंबई पोलिसांनी संदीपची पत्नी आणि त्याच्या पत्नीच्या आईविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुंबई मिररनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं.

15 फेब्रुवारीला संदीप हा त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटवर मृतावस्थेत आढळला. इथं त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. संदीपला अशा अवस्थेत पाहून त्याती पत्नी आणि मित्रांनी तातडीनं रुग्णालयाची धाव घेतली. जिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर संदीपनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्यानं फेसबुकवर एक नोटही लिहिली होती, ज्या नोटचा संदर्भ हा त्याची सुसाईड नोट म्हणून घेण्यात येत आहे.दरम्यान, सदर प्रकरणी मुंबई पोलिसांनी संदीपची पत्नी, सासू आणि सासऱ्यांचा जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर येत आहे.

संदीपनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यानं पत्नीकडून आपला छळ झाल्याचाही सूर आळवला होता. मुख्य म्हणजे त्याचा हा व्हिडीओ डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ‘पत्नीची सततची धमकी आणि तिच्याशी होणाऱ्या भांडणानं आता मी कंटाळलो आहे. तुम्ही कामाचा ताण सहन करु शकता, पण एका महिलेकडून अशा प्रकारे होणारा त्रास तुम्ही सहन करु शकत नाही’, असं तो म्हणाला होता. पत्नी आपल्यावर संशय घेत असून कारकिर्द बरबाद करण्याची धमकी देत असल्याची बाब त्याच्या या व्हिडीओनं सर्वांपुढं ठेवली होती.

संदीपनं त्याच्या या पोस्टमधून मनातील यातनांना वाट मोकळी करुन दिली होती. हिंदी कलाविश्वातील एका वेगळ्याच प्रकारच्या राजकारणाचा आणि भेदभावाचा सामना केल्याचं त्याच्या या व्हिडीओच्या माध्यमातून उघड झालं होतं. काही चित्रपटांचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतरही त्याच्याकडून ते प्रस्ताव काढून घेण्यात आले होते. या कलाविश्वात काम करणारी मंडळी ही भावनाविरहित आहेत, असंही तो म्हणाला होता.केसरी, एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी, यांसारख्या चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर झळकलेल्य़ा या अभिनेत्याचा असा अंत होणं ही बाब अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली.


 

 

Previous Post

खळबळजनक : अवघ्या १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

Auto Draft

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon