पोलिसांकडून अटकेचा मार्ग मोकळा
जळगाव (प्रतिनिधी) – न्यायाधीन बंदी चिन्या जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील पाचव्या क्रमांकाचा आरोपी आणि कारागृह रक्षक दत्ता खोत याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी १७ डिसेंबर रोजी न्यायालयाने निकाल दिला असून दत्ता खोत यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पोलिसांचा त्याला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांचा आक्षेप घेणारा खुलासा न्यायालयात दाखल करण्यात आला . त्यानंतर दत्ता खोत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होती
जिल्ह्यात गाजत असलेल्या चिन्या जगताप हत्याकांडातील सर्व पाचही आरोपी कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झालेला असला तरी ते फरार आहेत आणि कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर आहेत . पोलिसांना शोधूनही हे आरोपी सापडलेले नाहीत .
या आरोपींपैकी पाचव्या क्रमांकवरील आरोपी दत्ता खोत याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर पोलिसांनी आपला लेखी खुलासा दाखल केला आहे . हा गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार आहेत. दत्ता खोत याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो आणि तपासावर परिणाम होऊ शकतो असा आक्षेप पोलिसांनी न्यायालयात नोंदवला होता.
१४ तारखेला अंतिम युक्तिवाद झाला होता याबाबत आज १७ रोजी निकाल ठेवण्यात आला होता. त्यात न्यायालयाने मत प्रदर्शन केले की, मयत चिन्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्यावर एकवीस प्रकारच्या जखमा आढळून आले आहे. त्यात बहुतेक जखमा ताज्या होत्या आणि त्या जखमा मृत्यू होण्यास कारणीभूत असल्याचा डॉक्टरांचा अभिप्राय कोर्टाने ग्राह्य धरला. गुन्ह्याचे स्वरूप अतिशय गंभीर असल्यामुळे तसेच एका साक्षीदारांचा जबाब सुद्धा प्रथमदर्शनी गुन्हा घडला असल्याचे पुरेसा आहे. आरोपी हे सरकारी नोकर आहेत. असे मत नोंदवून कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
सरकार पक्षाकडून अँड. भारती खडसे यांनी काम पाहिले तर मुळ फिर्यादी तर्फे अँड जैनोद्दीन शेख यांनी लेखी आक्षेप नौदवून जामीनास विरोध केला होता.