जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील बालाजी इंजिनीयरींग वर्क्स या वर्कशॉप मध्ये मध्यरात्री चोरी करण्याच्या प्रयत्नातील दोन चोरट्यांना वर्कशॉपच्याच मालकाने रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्रृषीकेश किशोर विजयवर्गीय वय 19 रा. नितीन साहित्या नगर, सुप्रिम कॉलनी व भरत मधुकर सोनार (वय २७) रा. सुप्रिम कॉलनी अशी दोघा चोरट्यांची नावे असून दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. जयकिशन राजेंद्र विश्वकर्मा (वय-26) यांची एमआयडीसी परीसरात बालाजी इंजिनीयअरींग नावाने वर्कशॉप आहे.
या वर्कशॉपमध्ये दालमील मशिनचे साहित्य, स्पेअर पार्ट तयार होतात. रविवारी रात्री काम आटोपल्यावर नेहमीप्रमाणे शर्मा वर्कशॉप बंद करुन घरी गेले. यानंतर रात्री नेहमी प्रमाणे वर्कशॉपवर झोपण्यासाठी जयकिशन विश्वकर्मा यांचा भाऊ अमीत व कामगार हरीनारायण महातो हे गेले.
यादरम्यान अमित विश्वकर्मा यांना वर्कशॉपमध्ये दोन जण मशीन स्पेअरपार्ट तसेच इतर लोखंडी साहित्य चोरी करतांना दिसून आले. अमित यांनी कामगार हरिनारायण यांच्या मदतीने दोघांना पकडले. यानंतर भाऊ जयकिशन विश्वकर्मा यांना तसेच एमआयडीसी पोलिसांना प्रकार कळविला.
त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, भरत मधुकर सोनार व त्रृषिकेश विजयवर्गीय अशी दोघांनी आपआपली नावे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन याप्रकरणी जयकिशन विश्वकर्मा यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.