यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाघझीरा येथील वन विभागातील शासकीय निवास्थानात अज्ञात लोकांनी प्रवेश करून दोन वनरक्षकांच्या मोटर सायकली जाळल्याची घटना घडली आहे. हि घटना दि. १६ / ०८ / २०२० रविवार रोजी पहाटे १ ते २ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत मिळालेली अशी की यावल तालुक्यातील वाघझीरा येथील वन विभागातील शासकीय निवास्थानात दि. १६ / ०८ / २०२० रविवार रोजी पहाटे १ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात लोकांनी प्रवेश करून सातपुडा वन विभागाच्या पश्चिम क्षेत्र वाघझीरा क्षेत्रात वन चौकीत सेवेत कार्यरत असलेल्या वनरक्षक संदीप पंडीत यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी नं. एमएच २२ ए एफ ५४८३ व वनरक्षक राकेश निकुंभे यांची बुलेट गाडी नं. एम एच ३९ ए ई ७३५५ या दोन्ही मोटरसायकली पेटवुन दिल्या व संशयित आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. दोन्ही मोटरसायकला लागली आग दोन्ही वनरक्षकानी विझवली पण तो पर्यत दोन्ही मोटरसायकली जळून खाक झालेल्या होत्या. वन विभागाच्या पश्चिम क्षेत्र वनरक्षक संदीप पंडीत यांच्या फिर्यादी वरून काही संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम यावल पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. काही महिन्या पुर्वी या दोन्ही वनरक्षकानी दि. १७ मे २०२० रोजी अवैद्य सागवान माल पकडला होता व याच कर्मचाऱ्यावर संशयित आरोपी नी हल्ला केला होता व ते पसार झाले होते याचा गुन्हा दि. १८ मे २०२० रोजी राकेश निकुंभे यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिस स्टेशन दाखल करण्यात आला होता या गुन्हातील संशयित आरोपीनी द्वेषभावनेतून दोन्ही मोटरसायकली जाळल्या असाव्यात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच उमेश वावरे (विभागिय वनअधिकारी दक्षता पथक, धुळे ) , प्रकाश मोरणकर (उप वनसंरक्षक यावल वनविभाग, जळगाव ), विक्रम पदमोर ( वनपरिक्षेत्र अधिकारी , यावल पश्चिम ) व सर्व रेन्ज स्टॉप यावल पश्चिम यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे प्रकारामुळे वनक्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.








