जळगाव ( प्रतिनिधी ) – आसोदा रेल्वे गेट समोर धावत्या रेल्वेखाली तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपुर्वी तरूणाच्या वडीलांनी देखील धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लखन संजय सोनवणे (वय-२२) रा. सुनसगाव सुनसगाव ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. लखन सोनवणे हा दोन भाऊ व आईसह वास्तव्याला आहे. सुनसगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. बाहेर जावून येतो असे घरात सागुन गेलेल्या लखनने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खंबा क्रमांक ४३३/२१ येथे पवन एक्सप्रेस समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातील ओळख पटलेली नव्हती. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली होती. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन वर्षांपुर्वी लखन सोनवणेचे वडील संजय सोनवणे यांनी अंदाजे दोन वर्षांपुर्वी याच पध्दतीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती लखनच्या नातवाईकांनी दिली आहे. या घटनेमुळे सुनसगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयताच्या आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ असा परिवार आहे.