पहूर ता. जामनेर( प्रतिनिधी ) – पहूर येथे संतोषी माता नगरात महिलांना भोंदू गिरी करून लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाकोद येथील गोविंद गंगाराम जोशी आणि सुनील साकरू जोशी या दोघा तरुणांनी संतोषी माता नगरात महिलांना भंडार्यासाठी धान्य व कुटुंबकलह थांबण्यासाठी सोन्याचा नाग घडवून द्या अशी मागणी केली.
अगरबत्ती व धूप लावून महिलांकडून त्यांनी सहाशे रुपये लुबाडले. एवढेच नव्हे तर, पुढील अनर्थ टाळण्यासाठी सोन्याचा नाग दान द्यावा लागेल असे आमीष दाखविले. याबाबत महिला चर्चा करत असतांनाच या प्रकाराची परिसरातील नागरिकांना माहिती मिळाली. यामुळे लोकांनी या दोघा तरुणांना चांगलाच चोप देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली करून तक्रार दाखल केली.पोलिसांनी देखील त्यांना पोलीसी खाक्या दाखवून समज दिली. दरम्यान, अशा भोंदू पासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.