जळगाव ( प्रतिनिधी ) – औरंगजेबाचे उदात्तीकरण नको , अशी भूमिका घेत शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानने एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा निषेध केला आहे .
एमआयएमचे खासदार अकबरउद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीवर गुडघे टेकवून महाराष्ट्राला खिजवण्याचे काम केले आहे. स्वराज्याचा शत्रू औरंगजेब हाच त्यांचा आदर्श आहे औरंगजेबाने स्वतःच्या भावाची हत्या केली, वडीलाला कैद केल, रयतेवर अमानूष अत्याचार केले, शीखांचेचे गुरु तेग बहादुर यांचा व छत्रपती संभाजी महाराजांवर ४२ दिवस अतोनात अत्याचार करून शिरच्छेद करणाऱ्या, काशी उद्ध्वस्त करणाऱ्या आणि ४.९ दशलक्ष हिंदूंची हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर प्रार्थना करणाऱ्या ओवेसीचा जाहीर निषेध आंदोलन शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले
हा उदात्तीकरणाचा प्रकार थांबला नाही तर यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल ही कबर महाराष्ट्रातून नष्ट करण्यासाठीही मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले आहे. या वेळी जिल्हा प्रमुख गजानन माळी श्रीमंत शिवतेज प्रतीष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे, सचिन सावळे , शहूल चौधरी, सुरेश पाटील, किरण मराठे, पंकज बोळी , मोहन पाटील , अक्षय मराठे , फिरण कोळी, ललीत पाटील आदी उपस्थित होते.