जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी कांचन नगरातून १५ जुलै रोजी सांयकाळी अटक केली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर ७०३ /२०२१ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील संशयित आरोपी शुभम उर्फ दादू किशोर पाटील ( रा. कांचन नगर) हा फरार होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो नि प्रताप शिकारे यांना संशयित शहरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार १५ जुलै रोजी शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकातील स फौ आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, छगन तायडे, योगेश बारी, किशोर पाटील यांनी सायंकाळी संशयित शुभम पाटील याला कांचन नगर परिसरातून अटक केली त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.