मुंबई (वृत्तसंथा) – कोविडच्या संकटात महाविकास आघाडीने काम करुन दाखवले. देश आणि राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असताना देखील आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आदरणीय खा. शरद पवार साहेब, काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी,आणि मा. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे,यांचे आशीर्वाद सोबत असेपर्यंत या महाविकास आघाडी, सरकारला कोणताही धक्का लागणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
आज(बुधवार, 16 डिसेंबर) जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.