संबळ (वृत्तसंस्था) – उत्तरप्रदेश परिवहन मंडळाच्या एका बसची गॅस टॅंकरला आज सकाळी धडक बसून झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले तर 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात धनारी पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाला. जखमींना विविध रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मोराबादचे पोलिस महानिरीक्षक रामीत शर्मा यांनी सांगितले की, अपघातग्रस्त टॅंकर मधील गॅसची गळती होण्याचा धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आहे.
आग्रा-मोरादाबाद रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
या दुघर्टनेबद्दल मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी तीव्र दुख: व्यक्त केले असून आपदग्रस्तांना आवश्यक ती मदत पुरवण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.