जामनेर ( प्रतिनिधी ) – येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जि. प. शाळेसमोर नवकार प्लाजामध्ये अभिता लँड सोलुशन प्रा लि च्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप या महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे सुनील शेळके ( विशेष कार्य अधिकारी महसूल व ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाचा फित कापून शुभारंभ करण्यात आला. महसूल संदर्भीय सुविधा या अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या पद्धतीचा अवलंब करून पुरवणाऱ्या अभिता लँड सोलुशन प्रावेट लिमिटेड कार्यालयाविषयी सुनील शेळके यांनी माहिती दिली. जामनेर तालुक्यातून आलेल्या मान्यवरांचेदेखील स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वी राजपूत यांनी केले. मान्यवरांचे आभार गणेश पाटील यांनी मानले.