नागपूर (वृत्तसंस्था) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे कोरोना व्हायरस आणखी किती भयानक रूप घेऊ शकतो आणि कधी जाईल याची कोणतीच गॅरंटी नाही. दिवसागणिक घरे कोविडग्रस्त होत आहेत आणि येणाऱ्या १५ ते एका महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही. लोकांनी सर्वात चांगल्या गोष्टींसाठी विचार केला पाहिजे मात्र त्यासोबतच सगळ्यात वाईट वेळेसाठी तयार राहिले पाहिजे. या महामारीविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.

नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे कोरोना केंद्राचे उद्घाटन केले. या निमित्त भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. गडकरी यांनी या महामारीविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज यावर जोर देत म्हटले की, स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि कोणालाचा माहीत नाही की हे कधीपर्यंत राहील.
नागपूर येथून खासदार नितीन गडकरी यांनी येथील रुग्णालयंसाठी ४० टन ऑक्सिनजनच्या पूर्ततेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, एम्स नागपूरमध्ये ३०० खाटा अधिक आहेत तसेच रुग्णालयांसाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनची पूर्तता केली जात आहे.
रेमेडेसिवीरच्या तुटवड्याबाबत गडकरी म्हणाले की देशात केवळ चार औषध कंपन्यांमकडे कोविड १९ विरोधी या औषध निर्मितीचे लायसन्स आहे. केंद्र सरकारने बुधवारी या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी ८ कंपन्यांना परवानगी दिली आहे. ज्यामुळे रेमेडिसिवीर औषधांचा तुटवडा जाणवणार नाही.







