जळगाव (प्रतिनिधी) – एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रीय आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रकृती उत्तम असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या अध्यक्षा तथा माजी महसूल-कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी कु.सारा प्रांजल खेवलकर हि देखील कोरोना पॉझिटिव्ह असुन दोघींनाही जळगाव येथील सारा हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले असुन. त्यांच्यावर डॉ.मिनाज पटेल, डॉ.सुयोग चौधरी, डॉ.गौरव पाटिल, डॉ.प्रांजल खेवलकर, डॉ. मोइज देशपांडे, डॉ.प्रितेश नाईक, डॉ.अभिषेक ठाकुर, डॉ.प्रभाकर पाटील, व इतर डॉक्टर उपचार करीत आहे.
याबाबत रोहिणी खडसे म्हणाल्या की, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने, मागील 7-8 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोराना चाचणी करुन घ्यावी. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच कोरोनावर मात करुन, पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजु होईल असेही त्यांनी सांगितले आहे.







