जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील पळसखेडे येथे राहणाऱ्या अश्विनी ज्योतीलाल वंजारी (वय १४) या मुलीस १४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता विषबाधा झाली होती. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ८.४५ वाजता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








