जळगाव ( प्रतिनिधी ) – हमालांना कमी पैसे देवून मालकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याची तक्रार केल्याच्या रागातून मालधक्क्यावरील मुकादमावर चॉपरने वार केल्याची घटना घडली शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राजू बिसमिल्ला पटेल (वय-४७) हे राजमालती नगर, दुध फेडरेशन रोड येथे कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. जळगाव रेल्वेस्टेशनवरील माल धक्क्यावर मुकादम म्हणून कामाला आहे. नेहमीप्रमाणे १४ मे रोजी कामावरून दुपारी घरी जेवणासाठी गेले. त्यानंतर राजू पटेल यांना एकाला फोन आला की, मालधक्क्यावर भांडण सुरू आहे तुम्ही माल धक्क्यावर या असे सांगितले. पटेल मालधक्क्यावर गेले. मालधक्क्यावर हमालांना कमी पैसे देवून मालकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्यााची तक्रार राजू पटेल यांनी माथाडी मंडळाकडे केली होती. या तक्रारीच्या रागातून छोटू बाविस्कर व इतर आठ जणांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. छोटू बाविस्कर याने चॉपरने पटेल यांच्या पायावर वार करून जखमी केले. नंतर राजू पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात आबा बाविस्कर, छोटू बाविस्कर आणि इतर ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.