जळगाव ( प्रतिनिधी ) – मलीक नगरातील बॉम्बे ब्रेकरीजवळून २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सज्जाद शाह अकबर शाह (वय-२७ ) हे . मलीक नगर येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीएल ९०४०) क्रमांकाची मोटारसायकल आहे. ११ मे रोजी रात्री त्यांनी त्यांची मोटारसायकल घराजवळील बॉम्बे बेकरीच्या गल्लीजवळ लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मोटारसायकल चोरून नेल्याचे १२ मे रोजी सकाळी उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. अखेर १४ मे रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.