जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेश कॉलनीतून मोटारसायकल अज्ञातांनी चोरून नेली जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपेश चंद्रकांत शेलार (वय-२३ , रा. गणेश कॉलनी,जळगाव ) हा तरूण शिक्षण घेतो . त्यांच्याकडे त्यांच्या मित्राची मोटारसायकल (एमएच १९ डीडी १२०६) आहे. महाविद्यालय आणि शिकवणीसाठी तो मोटारसायकलचा वापर करतो. २५ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली आहे. सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मोटारसायकल आढळून आली नाही. अखेर १४ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.