जळगाव ( प्रतिनिधी ) – जुगारात जिंकलेले पैसे मागणाऱ्या पिंप्राळा भागातील तरुणालाच मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या ३ आरोपींच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ईमान शेख हमीद ( वय 25 धंदा मजुरी रा. सुन्नी मस्जिद जवळ बिल्डिंग नं. 16, घर नं. 17 पिंप्राळा हुडको, जळगाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , 15 मे रोजी रात्री कच्ची खोली भागात मी फटका नावाच्या पत्यांच्या खेळात 25 हजार रुपये जिंकलो होतो ते पैसे मागीतल्यावरून जाकीर पठाण , जावेद पठाण , पठाण रसुद (पुर्ण नावे माहीत नाही , सर्व रा. पिंप्राळा हुडको ) यांच्या सोबत माझे वाद झाले मी जुगारातील जिंकलेले पैसे देण्यास त्यांनी नकार दिला व तुला काय करायचे ते कर आम्ही पैसे देणार नाही अशी धमकी दिली . त्यामुळे मी तेथुन घरी गेलो. थोड्या वेळाने हे तिघे
माझ्या घरी आले व मला बाहेर बोलवले मी बाहेर आलो असता जाकीर पठाण याने लाकडी बॅटने माझ्या डोक्याच्या डाव्या बाजुस दुखापत केली जावेद पठाण व पठाण रसुद यांनी मला मारहाण करून डोळ्याजवळ जखम केली. मी जुबेर शेख व आसीफ खान यांचेसोबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गेलो
माझ्या डोक्यातून रक्तश्राव होत असल्याने मला पोलिसांनी उपचारासाठी मेमो दिला जुबेर शेख व आसिफ खान यांनी मला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले आहे. हे कॉ कालसिंग बारेला पुढील तपास करीत आहेत भा दं वि कलम ३२४ , ३२३ , ५०६ , ३४ नुसार या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.