अमृतसर (वृत्तसंस्था) – पंजाबच्या मोहालीमध्ये राहणारे क्रांतिकारी स्वर्गीय भगत सिंह यांचे पुतणे अभय संधू यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून अभय हे सतत सिंघु बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनात सहभागी होत होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक् केले आहे. त्यांनी म्हटले की, शहीद-ए-आझम भगत सिंह यांचे पुतणे अभय सिंह संधू यांचे दिर्घआजाराने निधन झाले. त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च आम्ही करणार आहोत. वाहेगुरुने त्यांना शांती प्रदान करावी.
यापूर्वी अभय हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहित सुद्धा सीएम अमरिंदर सिंह यांनी दिली होती. त्यांनी ट्विट करून लिहिले होते की, अभय संधू कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळाली आहे. सीएमने सांगितले की, अभय यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे आणि लवकरच ते बरे होतील अशी आशा आहे.
अभय संधू भगत सिंह यांचे लहान भाऊ सरदार कुलबीर सिंह यांचे सुपूत्र आहेत. अभय यांनी सुद्धा आपल्या वडीलांप्रमाणे राष्ट्रीय अभिलेखागारमध्ये ठेवलेल्या फाइल सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या हाती नेहमी निराशाच आली. शहीद भगत सिंह यांच्याशी संबंधीत फाइल गोपनीय ठेवण्यात आल्या. त्यांनी हे सुद्धा म्हटले होते की, त्यांच्या कुटुंबावर सुरक्षा एजन्सीद्वारे लक्ष ठेवले जात आहे.