• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरकारने सांगितली ब्लॅक फंगसची लक्षणे आणि बचावाचा उपाय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ‘ब्लॅक फंगस’ या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर रुग्णाला दृष्टीही गमावू लागू शकते.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नागरिकांना ब्लॅक फंगसचे सुरुवातीची लक्षणे आणि ते कसे ओळखायचे याचा सल्ला दिला आहे. याची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यानुसार त्यांनी ट्विटरवर सांगितले, की जागरूकता आणि सुरुवातीची लक्षणे ओळखून या धोक्यापासून वाचता येऊ शकते.

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते.

कोणाला याचा धोका जास्त?

‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नुसार, फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असेल. त्यामुळे असह्य दुखणे, डोळे लाल होणे, वेगाने डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचारांची गरज आहे.

काय आहेत याची लक्षणे?

डोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. त्यामुळे या लक्षणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कसा उद्भवतो हा आजार…

हा आजार खूपच कमी लोकांना होतो. ज्या लोकांना मधुमेह आहे अशांना जास्त धोका आहे. जास्त प्रमाणात स्टेरॉईड घेणारे आणि ICU मध्ये जास्त दिवसांपर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो.

कसे वाचायचे यापासून?

‘ब्लॅक फंगस’पासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. बूट, लांब बाह्यांचे शर्ट, फुल पँट आणि हातमोजे घालून राहिले पाहिजे. तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

काय करू नये?

ब्लॅक फंगसपासून वाचण्यासाठी लक्षणांवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. बंद नाक झालेल्या सर्व प्रकरणात बॅक्टेरियल सायनसायटिस समजण्याची चूक करू नये. विशेष करून कोविड-19 आणि इम्युमोसप्रेशनचे प्रकरणात अशाप्रकारच्या चुका करू नये.


 

 

Previous Post

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

‘म्युकर मायकोसिस’वरील इंजेक्शन महाराष्ट्रातील कंपनी तयार करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'म्युकर मायकोसिस'वरील इंजेक्शन महाराष्ट्रातील कंपनी तयार करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

March 18, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
1xbet russia

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 18, 2026
वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान
1xbet russia

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट
1xbet russia

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

March 18, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon