पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा ते एरंडोल हायवे रस्त्यालगत अमृतसर धाब्याजवळ एक टँकर मधून डांबर चोरी होत आहे अशी गोपनीय बातमी मिळालेने पारोळा पोलीस आणि आयजीच्या पथकाने छापा टाकला. त्यानुसार ६ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
टँकर क्र. जिजे ०६ बीटी २७५ व एमएच ०४ एफयु ५७३० या टँकरमध्ये डांबर टाकताना संशयित मिळून आले आहे. दोन्ही टँकर तसेच पांढरे रंगाची बोलेरो पिक अप जिजे ०५ सीयु ४७५४ व एमएच ०४ एचवाय ६५७६, एक टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो क्र. एमएच १८ एम १७ असे वाहन व ४ ड्रम डांबरने भरलेले, तीन प्लास्टिकचे तेलाचे ड्रम, आसारी असा मुद्देमाल घटना ठिकाणी मिळून आला आहे. मुद्देमाल किंमत ४४ लाख ९१ हजार ४३ रुपयांचा जप्त करून एकूण सहा आरोपी ताब्यात घेतले आहेत.
संशयित आरोपींमध्ये अजय भाऊसाहेब जाधव रा म्हसवे, माईसाहेब नाना मालीच, रा मोगन जि धुळे, भीमराव शंकर ठाकूर रा. म्हसवे, राजकुमारदास हिरा दास रा भागवनपूर, उत्तर प्रदेश, कमलेश प्रेम कुशवाह कुशीनगर, उत्तर प्रदेश, युवराज हिम्मत पाटील रा. मोगन जि धुळे यांना घटनास्थळीच ताब्यात घेतले असून अली पूर्ण नाव माहिती नाही, विनोद राजदेव रा जोनपूर हे दोघे पळून गेले आहेत. सर्व संशयिताविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. कारवाई पो नि रोहम, पो उपनि शैलेश पाटील, हेकॉ शेख शकिल, पोना प्रमोद मंडलिक, चापोकॉ नारायण लोहरे सर्व आयजि यांचे पथक, नाशिक तसेच पारोळा पोस्टे चे पोनि रामदास वाकोडे, पोउपनि राजू जाधव, हेकॉ विजय भोई, पोकॉ हेमचंद्र साबे असे मिळून संयुक्त कारवाई केलेली आहे.