जळगाव (प्रतिनिधी) – कर्तव्यावर असलेल्या तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा भुसावळ येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. हा पोलीस भुसावळ शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होता.
सागर दिलीप देहाडे (वय ३२) असे मयत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.सागर हा नेहमी प्रमाणे सकाळी पोलिस ठाण्यात आला. हजेरी लावून तो समंस बजावणीसाठी निघाला. तितक्यात छातीत दुखू लागल्याने जागीच बसला. त्याला सहकाऱ्यांनी तातडीने ट्रामा केअर सेंन्टरला दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात नेत असतांना रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालविली. मयत सागर याच्या पश्चात गरोदर पत्नी, मुलगा असा परीवार आहे.