जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रिम कॉलनी प्रबुध्द नगरातील २४ हजार स्क्वेअर फुट परिसराच्या ‘नालंदा बुध्दाविहार येथे तथागत भगवान गौतमबुध्दांची ८ फुटाच्या अष्टधातुची सोन्याचा मुलामा असलेली भव्य मुर्तीची स्थापना दि.१९ मार्च रविवार रोजी सकाळी ११:३० वाजता होणार आहे.
बौध्द धम्मगुरू भदंत सुगतवंसजी महाथेरो, भदंत करूनानंदजी थेरो, भदंत ज्ञानरक्षीतजी थेरो, भदंत धम्मबोधीजी थेरो, भदंत संघरत्नजी थेरो, भदंत एन. धम्मानंदजी थेरो यांच्या प्रमुख उपस्थीतीत होणार आहे. या वेळी ५-६ हजार धम्म उपासक, उपासिकांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मुख्य आयोजक भारतरत्न डॉ. बी. आर आंबेडकर बहुउदेशिय संस्थेचे मुख्य आयोजक अध्यक्ष संदिप शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
तथागत भगवान गौतमबुध्दांची ८ फुटांची भव्यमुर्ती ही थायलँड येथून आणण्यात आलेली असून अष्टधातू व सोन्याचा मुलामा असलेली भव्यमुर्ती थायलँड येथुन गगन मलीक फाउंडेशन यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेली आहे. जळगाव शहरात प्रथमच २४ हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर भव्यदिव्य नालंदा बुध्दविहार उभारण्यात आलेले आहे. शहरातील सर्वात मोठा परिसर असलेल्या जागेत सर्वात उंच भगवान बुध्दमुर्तीची स्थापना होत आहे.
रविवार सकाळी ८ ते १० वाजता बुध्दरूप मिरवणुक (धम्मरॅली) निघणार असून सकाळी १० ते १०:३० वाजता पु. भिक्खु संघाचे भोजनदान. सकाळी १०:३० ते ११: वाजता धम्मध्वजारोहण, बुध्दरूपाची प्रतिस्थापना सकाळी ११:३० ते दुपारी २ वाजे पर्यंत पु. भिक्खु संघाची धम्मदेसना (धम्मसंस्कार वर्ग) आणि दुपारी २ पासून सार्वजनिक भोजनास प्रारंभ होईल. या वेळी जिल्हायाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महापौर जयश्री महाजन, ऍड. राजेश झाल्टे, म.न.पा.आयुक्त विद्या गायकवाड, ललीत कोल्हे, उपमहापौर कुलभुषण पाटील. मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्याक्ष युवराज सोनवणे उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेस अध्यक्ष संदीप शिरसाठ, हरिश्चंद्र सोनवणे, योगेश नन्नवरे, विलास यशवंते, प्रविण सपकाळे, सतिश शिरसाठ व धम्मबांधव उपस्थित होते.