जामनेर ( प्रतिनिधी ) – सुपर मार्केट, किराणा मॉल्स अशा ठिकाणी खुल्या वाईन विक्रीला विरोध दर्शविणारे निवेदन आज जामनेरच्या शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, किराणा मालाच्या तसेच मॉलमध्ये वाईन विक्री करुन शासन काय साधणार आहे हे कळत नाही.संपूर्ण महाराष्ट्राच्या जनजीवनावर याचे विपरीत परिणाम होणार असे स्पष्ट दिसत आहे. राजरोस दारु पिणारी परकीय संस्कृती या महाराष्ट्राला कधीच नको आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय तात्काळ स्थगित करावा तो झाला नाही तर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करण्यात येईल आशा इशारा शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शुभम माळी, आदीत्य देवरे, सोज्वल तेली नरेश माळी, रिवेश तेली, संतोष सोनार, तेजस सूर्यवंशी, विजय पवार, गणेश माळी, रोहन जाधव, विलास ढाकरे
आदी यावेळी उपस्थित होते.